बिरू कोळेकर यांनी धनगर एसटी आरक्षण, विद्यार्थ्यांच्या अडचणी, मेंढपाळ समुदायाच्या समस्या तसेच विविध समाजातील अनेक सामाजिक मुद्द्यांवर शासन आणि प्रशासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत संस्था पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे.आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कोळेकर म्हणाले की, “ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर समाजहितासाठी अधिक जोमाने आणि दृढ निश्चयाने काम करण्याची नवी प्रेरणा आहे. शिक्षण-संस्कार-संघटन आणि देव-देश- धर्म या तीन स्तंभांना बळकटी देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शांनुसार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
समाजातील सर्व घटकांचे सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हेच आपले बळ असल्याचे सांगत कोळेकर यांनी पुढील वाटचालीतही सर्वांची साथ लाभावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच दिलेल्या शुभेच्छा आणि विश्वासामुळे समाजासाठी सकारात्मक परिवर्तन घडवण्याची उर्मी अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले.जमातीतील आणि संस्थेतील अनेकांनी कोळेकर यांच्या फेरनियुक्तीचे स्वागत करत आगामी काळातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments