नगर/प्रतिनिधी
परिवर्तनवादी व सुधारणावादी लेखक 'दीनमित्र 'कार मुकुंदराव पाटील यांचे कर्तृत्व महात्मा फुले यांच्यानंतर महत्त्वाचे आहे .त्यांच्या नावाने दिलेला पुरस्कार म्हणजे आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर येथील साहित्यिक डॉ. संजय बोरुडे
पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना केले .
शुक्रवार, दि . १९ डिसेंबर २०२५ रोजी तरवडी, ता .नेवासा येथे अध्ययनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले .हा राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.वैचारिकता जपणाऱ्या आणि मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणाऱ्या पुस्तकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो .हा पुरस्कार सत्यशोधक विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले आणि महात्मा फुले यांचे कर्ते अनुयायी असलेल्या पाटलांच्या नावाने दिला जात असल्याने महाराष्ट्रामध्ये या पुरस्काराची वेगळी प्रतिष्ठा आहे .
कथा , कविता, समीक्षा ,कादंबरी ,ललित गद्य आणि वैचारिक लेखन यासाठी हा पुरस्कार दिला जातो .यावर्षी कथेसाठी माधव जाधव,समीक्षेसाठी राजेंद्र सलालकर ( प्रवरानगर ) ;कवितासंग्रहासाठी धनाजी घोरपडे ( कोल्हापूर ) संपादनासाठी सचिन वसंत पाटील (सांगली )यांना आणि ललित गद्य साठी डॉ . संजय बोरुडे(नगर ) यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले .आमदार सुधीर तांबे,माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग आणि दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष उत्तमराव पाटील यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले .

Post a Comment
0 Comments