कोल्हापूर /प्रतिनिधी
' सध्या सभोवताल अस्तित्वाच्या लढाईचा काळ बनला आहे. आव्हानं पेलत असताना प्रत्येक माणसाची अस्वस्थ घालमेल सुरू आहे. ही अस्वस्थताच लेखकाच्या निर्मितीचे केंद्र ठरते. हरवत निघालेली नात्यांमधली संमेलनशीलता चिंतनीय आहे. कोरडेपणाच्या काळात स्वतःलाच अनेकदा तपासता आले पाहिजे.'असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी केले. नरेंद्र विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विविध पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रारंभी स्वामी विवेकानंद व स्व.डाॅ. न.ना. देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व भूमिका संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरविंद देशपांडे यांनी केले मान्यवरांचे स्वागत श्री पी एन देशपांडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नरेंद्र विद्यापीठ संस्थेच्या कार्याला पस्तीस वर्षं पूर्ण झाल्याबद्दल अनुभव स्मरणिकेचे शानदार प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.संपादक श्री. अमोल शेणई यांनी अनुभव या ग्रंथाच्या संपादनामागील अनुभव मांडले. यानंतर स्व डॉ.न. ना. देशपांडे काव्य पुरस्कार चालू इसवी सनाचे चिरदाह ( हनुमान व्हरगुळे, परभणी) बाईपण ( योगिता राजकर,वाई) झांजरझाप ( विलास माळी, गडहिंग्लज) दिवस कातर होताना (धर्मवीर पाटील, इस्लामपूर) स्व.दमयंती नरेंद्र देशपांडे गृहिणी गौरव पुरस्कार सौ.मानसी दिवेकर यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, सेवा गौरव पुरस्कार, आणि सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये धर्मवीर पाटील,इस्लामपूर, योगिता राजकर वाई, हनुमंत व्हरगुळे, परभणी, विलास माळी, गडहिंग्लज, मानसी दिवेकर, कोल्हापूर, प्रा. वसंत पाटील,हे सर्व पुरस्कार विजेते होते.
दर्जेदार पुस्तकांसाठी please visit
: www. sahityakshar.com
चंद्रकांत बाबर यांच्या अमेझॉनवरील पुस्तकांसाठी..
https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY


Post a Comment
0 Comments