Type Here to Get Search Results !

मिरज रेल्वे जंक्शनबाबत दुजाभाव का? विशाल पाटील आक्रमक

 पुण्यात रेल्वेची बैठक, गैरसोयींच्या प्रश्नावर विचारला जाब






सांगली/ प्रतिनिधी



मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे केंद्र आहे, मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात रेल्वेने नेहमी आखडता हात घेतला आहे. त्याचा तातडीने विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज पुण्यात आयोजित पुणे, सोलापूर मंडलमधील खासदारांसोबत झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली.

रेल्वेचे विविध प्रश्न समजून घेणे आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी कृती आराखडा बनवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, डॉ. शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, निलेश लंके, डॉ. अमोल कोल्डे, श्रीरंग बारणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडीत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. विशेषतः मिरज जंक्शनबाबत त्यांनी ‘टू द पॉईंट’ चर्चा केली.

ते म्हणाले, ‘‘मिरज रेल्वे जंक्शनवर फलाट क्रमांक एक वगळता २, ३, ४, ५, ६ या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुरे आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सरकता जिना नाही. प्रवाशांना ओझ्या बॅग घेऊन जाणे अडचणीचे होते. फक्त एक, तीन, चार क्रमांकाच्या फलाटावर लिफ्ट आहेत. अन्यत्र त्या बसवायला हव्यात. पॅसेंजर जाग्डाय फलाक ५, ४ व २ या ठिकाणी उभ्या केल्याने दिव्यांग व ज्येष्ठ प्रवाशांचे हाल होतात. पार्किंगचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लालसाठी वेटिंग रुमचा अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा असतो. पिटलाईनचे काम अद्याप पूर्ण नाही. जंक्शनमधील मॉलचे काय झाले कळत नाही. विशेष गाड्या सोडण्याबाबत नेहमी उदासिनता दाखवली जाते. चाईल्ड हेल्पलाईनला अपुरी जागा आहे. या परिस्थिती बदल होणार आहे की नाही?’’

ते म्हणाले, ‘‘मिरज मॉडेल स्थानकाचे काम लवकर सुरु करावे. सांगली-परळी एक्स्प्रेस डेमूऐवजी आयसीएफ डब्याची सोडावी. भिलवडी स्थानकावरील एफओबी ताबडतोब बांधण्यात याव. ताकारी रेल्वे स्थानकास महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि कोयना एक्‍स्प्रेसचा थांबा द्यावा. मिरजमधून बेळगाव, लोंडा, कॅसलरॉक, हुबळीसाठी पॅसेंजर धावतात. त्या धर्तीवर पंढरपूर, कुर्डुवाडी, सातार पॅसेंटर गाड्या सुरु कराव्यात.’’



प्रमुख मुद्दे


- जत-विटा-कराड रेल्वे लाईनसाठी सर्वेक्षण वेगाने करून निर्णय घ्यावा

- मिरज ते कोल्हापूर, मिरज ते पंढरपूर, मिरज ते पुणे या रेल्वे लाईवरील नवीन गाडी, पूल बांधकाम, अंडर पास रोड पावसाळ्यात पाण्याने भरून जातात, त्यावर उपाय योजनांची मागणी

- खासदारांच्या पत्रावर रेल्वेत तिकिटांचा काळाबाज होतो, तो थांबवण्याची सूचना

- कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित

- किर्लोस्करवाडी, वसगडे येथील पुलाचे काम अपूर्ण का? सांगलीत चिंतामणनगर पुलावर पथदिवे का नाहीत?

- सांगली रेल्वे स्टेशनवर मालधक्क्यावर लागणाऱ्या रेल्वेंना प्लॅटफॉर्म, रॅक लवकरत मिळत नाहीत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते



सांगलीबाबत आग्रह 


- सांगली रेल्वे स्टेशनवर टर्मिनल कोचिंग पिटलाईन व रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा निर्माण करणे

- हुबळी-सांगली-पुणे रेल्वे मार्गावर सुरू होणाऱ्या सर्व नवीन गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देणे

- सांगली रेल्वे स्थानकावर निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांतीचा थांबा देणे

- सांगली रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांना सोलापूर,अक्कलकोट, गाणगापूर कलबुर्गी जाता यावे यासाठी कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देणे

- कर्नाटकातून येणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्या उगार व मिरज तालुका दरम्यान पसंतास थांबून असतात. या गाड्यांना पुढे सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करून विश्रामबाग स्टेशनवर थांबा द्यावा

- सकाळी सुटणारी कुर्डूवाडी मिरज पॅसेंजर गाडी सांगली रेल्वे स्टेशन वरून सोडावी

- आषाढी एकादशी निमित्त सुटणाऱ्या पंढरपूर जाणाऱ्या विशेष गाण्यास सांगली रेल्वे स्टेशन वरून सोडल्यास भाविकांची सोय होईल

- हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाडीला किर्लोस्करवाडी व कराड रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा

- सकाळची कोल्हापूर मिरज पॅसेंजर गाडी पुढे किर्लोस्करवाडी पर्यंत सोडावी व या गाडीला विश्रामबाग सांगली माधवनगर नांद्रे भिलवडी अमणापूर येथे थांबा द्यावा

- सांगली रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम व पार्सल बुकिंगची सुविधा द्यावी

-




दर्जेदार पुस्तकांसाठी please visit : www. sahityakshar.com

 

https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT

https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD

https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY

Post a Comment

0 Comments