Type Here to Get Search Results !

जगदीशब्द फाउंडेशनचा आदर्श उपक्रम; ‘त्या‘ बालकांना सलग चौथ्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप

 




करमाळा(प्रतिनिधी); 



कोरोना गेला पण अनेकांचं घर उध्वस्त करून गेला, तर काहींना पोरकं ही करून गेला. त्या कोरोना महामारीच्या काळामध्ये ज्या बालकांनी आपले आई-वडील गमावले. जी बालके एकल पालक आहेत. अशा करमाळा तालुक्यातील सोगाव, शेटफळ येथील बालकांना जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य प्रदान आले. विविध गावातील अशा 100 हुन अधिक बालकांचे फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. मागील चार वर्षांपासून त्यांना शैक्षणिक साहित्य व आधार दिला जात आहे.


या बालकांचे शिक्षण थांबू नये म्हणून जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने त्यांना स्कुल बॅग, सर्व वह्या, पेनपेन्सिल, कंपासपेटी असे शैक्षणिक साहित्य देण्यात येते. संस्थापक अध्यक्ष, लेखक व वक्ते जगदीश ओहोळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. 


यावेळी बोलताना सोगावचे सामाजिक कार्यकर्ते सतीश भोसले म्हणाले की, आज ही समाजात 10 कोटींची लॉटरी लागली तर मी पेन पेन्सिल घेईल, वह्या घेईन असा निबंध लिहिणारी विद्यार्थीनी आहे, म्हणजे समाजातील अनेक घटकांची परिस्थिती हे शैक्षणिक साहित्य विकत घेण्यासारखी नाही, त्यामुळे अशा सामाजिक संस्था व लोकांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक साहित्य पुरविणे गरजेचे आहे. जगदीश ओहोळ यांनी तर ऐन कोरोना काळात आमच्या गावातील अशा सर्वस्व गमावलेल्या घरातील बालकांना मोठा आधार दिला. त्यामुळे त्या परिवारातील मुलं मुली यांना शिक्षण घेणे सोपे झाले. त्याबद्दल गावाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.  



शब्दांना कृतीत आणणं महत्वाचं -

आपण अनेक वेळा, इतरांना मदत केली पाहिजे असं बोलत असतो. त्याचप्रमाणे भाषण, व्याख्यानामध्येही अनेक गोष्टी सांगत असतो. परंतु भाषणांमधील या शब्दांना सत्यात उतरवण्याची ही आमच्यासाठी संधी होती. आणि म्हणून कोरोना काळामध्ये जेव्हा भीषण परिस्थिती पाहिली तेव्हा वाटलं की, आई बापाचं छत्र हरपलेल्या या बालकांना आपण शैक्षणिक आधार दिला पाहिजे. तसेच आपण फक्त जेवायला दिलं तर यांचं पोट भरेल पण पुन्हा भाकरीचा प्रश्न निर्माण होईलच पण शिक्षण दिलं, शिक्षणाला मदत केली तर ते स्वयंपूर्ण होतील, शिकून सक्षम होतील व स्वत; सह इतरांच्या ही भाकरीची सोय करतील.. या विचारांतून जगदीशब्द फाउंडेशनच्या माध्यमातून 'शैक्षणिक पालकत्व' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही एक छोटी गोष्ट आहे पण हे केल्याचं समाधान मोठ आहे.

-जगदीश ओहोळ, व्याख्याते

लेखक; जग बदलणारा बापमाणूस

_____________________________


सोगाव येथील मुजीब मुलाणी (529), प्रशांत भोसले (489) या दोघांनी नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने त्यांना 'जग बदलणारा बापमाणूस' हे प्रेरणादायी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय गोडगे, सतीश भोसले, दादा सरडे, अनिल भोसले

मनोज घनवट, गुलाब, मुलाणी, मौलाली तांबोळी, जाफर तांबोळी, प्रवीण भोसले, कवी तानाजी शिंदे, निलेश पाखरे, अशोक शिंदे, अँड मनोज घनवट, दादा सरडे, अनिल भोसले, प्रशांत भोसले, मुजिब मुलाणी, मावलाली तांबोळी आदीजन उपस्थित होते.




 दर्जेदार पुस्तकांसाठी please visit :
 www. sahityakshar.com

चंद्रकांत बाबर यांच्या अमेझॉन वरील पुस्तक मागणीसाठी खालील लिंकचा वापर करा..

 https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY


Post a Comment

0 Comments