आरग / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील आरग येथील राज्य मॉडेल स्कूल व पीएम श्री अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे नव्याने शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला स्वागतोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने मुलांना किरीट घालून औक्षण करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कोऱ्या कागदावर उमटवण्यात आले. तसेच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी मोठा उत्साह दिसून आला. यावेळी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांकडे आता पालक व विद्यार्थ्यांचा मोठा ओढा दिसून येत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा, कला इत्यादी क्षेत्रात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत.गुणवत्ते बरोबरच भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने शाळेच्या सर्वांगीण दर्जा विषयी पालक निश्चिंत झाल्यानेच जिल्हा परिषद शाळांकडे पालक वळत आहेत, याचा अभिमान वाटतो असे म्हणतानाच पालकांनी असाच विश्वास आणि सहकार्य कायम ठेवावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक नेते हरिभाऊ गावडे यांनी केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे यांनी केले. यावेळी गणेश गुरव, संजय निकम, सतीश कुंभार, राजीव खंदारे, रुक्मिणी नाईक, निलोफर मुजावर, राजश्री कोष्टी, सुनिता मुंढे, पूजा पाटील, साधना पाटील, वासंती माळी , वैशाली पाटील, शीला गुरव, जयश्री कोरे या शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य काजल कांबळे, सोनल वडगावे यांच्यासह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अश्विनी कुंभार यांनी मानले.
चंद्रकांत बाबर यांची पुस्तके आता अमेझॉनवर उपलब्ध
पुस्तक खरेदीसाठी लिंक…
https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.
in/dp/B0FCM6BWHY



Post a Comment
0 Comments