सांगली/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यासाठी सुरू केलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार" योजनेची अंमलबजावणी काही ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असून, संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांच्याद्व्यारे मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
सदर पुरस्कार संदर्भात शासन निर्णय क्रमांक झेडपीए-२०१३/प्र.क्र.७६/पं.रा.-२, दिनांक १९ जानेवारी २०२१ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीतून दोन महिलांना दरवर्षी ३१ मे रोजी पुरस्कार दिला जाणे अपेक्षित आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याचा सन्मान होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे, असा शासनाचा हेतू आहे मात्र काही ग्रामपंचायतींनी आजवर हा पुरस्कार वितरित केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे शासन निर्णयाची पायमल्ली होत असून, महिलांच्या सन्मानाला धक्का बसत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.या
अनुषंगाने मंचाचे सह मुख्यप्रवक्ता आणि आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र ई-मेल द्व्यारे पाठवून सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर अंमलबजावणी यंत्रणा विकसित करण्याची मागणी केली आहे.
चंद्रकांत बाबर यांची पुस्तके आता अमेझॉनवर.... खालील लिंक वरून पुस्तके खरेदी करा



Post a Comment
0 Comments