पाटण -आडदेव : आडदेवचे ८० वर्षीय तरुण कवी, जगन्नाथ गायकवाड यांचा ‘माझं गाव हा कवितासंग्रह आई वडील ,व ग्रामदेवता सोमया, आणि गावची माती यांना अर्पण केला असून, ग्रामदेवतेला ‘आपल्या हातून कधीही अन्याय घडू नये अशी विनंती करणारा एक सदाचारी माणूस त्यांच्या कवितेत उभा राहतो.या कवितेत ईश्वराने सर्वाना सुखी ठेवावे ही विनंती असून त्यांच्या कवितेत स्वार्थीपण कुठेच आढळत नाही. ही त्यांच्या सदाचारी मनाची नीतीसूत्रे आहेत.नेकीने आणि सदाचाराने आयुष्य जगावे हा विचार त्यांच्या मनाचे अधिष्ठान झाले आहे. त्यामुळेच सरळमार्गी,रोखठोक जीवन जगणारे हे व्यक्तिमत्व कवितेतून उपदेश करत राहते. माणसाला मोह जास्त नसावा. मोहाने लालसेने माणसाच्या आयुष्याचा कचरा होतो. कष्टाने आणि नीतिमत्तेनेच आपले जीवन सुंदर बनते असा विचार पेरणारी कविता म्हणजे ‘ माझं गाव ’ हा कवितासंग्रह आहे.जगन्नाथ गायकवाड यांची कविता ,प्रेम ,आपुलकी जिव्हाळा ,कष्ट ,प्रामाणिकता व नीतिमत्तेने उजळलेली कविता आहे,असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते आडदेव येथे सोमय्या मंदिरात आयोजित केलेल्या माझं गाव या जगन्नाथ गायकवाड यांच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विधिज्ञ अॅड. उत्तमराव पाटील हे उपस्थित होते. यावेळी सरपंच कल्पना गायकवाड,उपसरपंच विमल पाटील,लक्ष्मण गायकवाड.. चेअरमन,महिपती गायकवाड, .. माजी चेअरमन., लक्ष्मण खोराटे, शंकर पुजारी,.कृष्ण खोराटे, गोरख नारकर, पाटण तालुका अध्यक्ष.. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डॉ.संजयकुमार सरगडे ,कृष्णा चिंचकर,निनू पाटील ,कृष्णत यादव , बाळकृष्ण खोराटे,सीताराम यादव, बाळकृष्ण गायकवाड, अशोक गायकवाड इत्यादी मान्यवर यांची उपस्थिती होते. मान्यवरांच्या हस्ते ‘माझ गाव या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. डॉ.वाघमारे पुढे म्हणाले की ‘ जन्म -जीवन -मृत्यू या चक्रात माणसात अनेक बदल होत असतात. निसर्ग बदलत असतो ,तसा माणूस बदलत असतो.मानवी परस्पर संबंधांनी माणसाचे जीवन विणले गेले आहे. आज म्हातारे म्हणून लोक बाजूला टाकण्याचा काळ असताना देखील तरुणाला लाजवेल अशी नितीमत्ता जगन्नाथ गायकवाड यांनी जोपासली आहे. शशिकांत पार्टे नावाचे कवी का कोकाटता म्हातारे म्हातारे ,आम्ही तर आहोत ,पृथ्वीवरील तारे असे सांगून अनुभवातून आलेले शहाणपण माणसाने घ्यायला पाहिजे असे सांगतात. संत तुकाराम हे खरे काय ,खोटे काय हे जाणून आम्ही घेत असतो हे सांगत उजळावया आलो वाटा असे म्हणतात. एखादा माणूस स्पष्ट दोष दाखवतो म्हणून तो वैरी असत नाही,तो हित चिंतक असतो. तो चांगली मने घडवून समाजाचे आरोग्य चांगले ठेवतो. जगन्नाथ गायकवाड आपल्या शुद्ध आचरणातून कविता लिहितात ,तेंव्हा ती कविता मूल्यवान होते. सम्यक होते. मर्यादित स्वार्थ कोण नाकारत नाही ,पण मन मानेल तसे विकृत जगणे स्वतःसहित इतरांना देखील त्रास देते. म्हणूनच नेहमी कष्टाने खावे ,स्वच्छ रहावे, नीतीने वागावे ,चारित्र्य जपावे ,निर्व्यसनी असावे , गुंड मवाली होऊ नये, भारत चांगला होण्यासाठी राजकारणी व्यक्तींनी चांगले रहावे , आपल्या गावमातीवर प्रेम करावे, सतत जीवनभर शिकत राहावे हा आदर्श विचार ‘माझं गाव’ मधून व्यक्त होतो. आडदेवचा निसर्ग मनभावन असून परदेशात सौंदर्य आहे असे नाही. तर सह्याद्रीतील आडदेव हेगाव ,तिथले मन्दिर हे इतके सुंदर आहे की पुढे हे पर्यटन स्थळ देखील होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात विधिज्ञ उत्तमराव पाटील यांनी जगन्नाथ गायकवाड यांच्या आरोग्य व कवितालेखनाबद्दल त्यांचे कौतुक केले .उत्तमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ.योजना पाटील यांचेसह अनेकांनी जगन्नाथ गायकवाड यांचा सन्मान केला
प्रा. विठ्ठल गायकवाड यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ गायकवाड यांचे शिक्षण घेत असतानाचा ,उत्साह ,राहणीमान , स्वच्छता या बद्दल सांगत हे समंजस विचारी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. तसेच रवींद्रनाथ टागोर, संत तुकाराम ,शेक्सपियर आणि इतर व्यक्तींच्या विचारांचे दाखले त्यांनी दिले. अॅड. अभयसिंह पाटील ,पांडुरंग गायकवाड , पाटील सर, इत्यादिनी आपले सुभाषचंद्र हायस्कूल मधील अनुभव सांगितले. यावेळी विधिज्ञ,अमित लाड ,श्रीकांत चावडीमुनी,पृथ्वीराज पाटील, कवी यांचे मेहुणे बबन शिंदे, ग्रामस्थ तानाजी गायकवाड ,मारुती गायकवाड ,सुर्यकांत गायकवाड , सतीश गायकवाड, इत्यादी मान्यवरासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. पेरणीचे दिवस असताना देखील या कार्यक्रमास सोमय्या मंदिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन विधिज्ञ चंद्रकात गायकवाड यांनी केले. आभार महिपती गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ.ताराबाई गायकवाड,सौ.पार्वती गायकवाड , वेदिका,मानस,व आडदेव येथील सर्व तरुण मंडळांनी केले.
चंद्रकांत बाबर यांची पुस्तके आता अमेझॉनवर...
https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY


Post a Comment
0 Comments