Type Here to Get Search Results !

अण्णा भाऊंना भारतरत्न आणि ज्ञानपीठ दोन्ही मिळायला हवे _ प्रा.डॉ. नंदा पाटील

 



खानापूर प्रतिनिधी 





साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी केवळ मराठी साहित्यातच नव्हे तर जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांचे अलौकिक लेखन कार्य पाहता त्यांना भारतरत्न व ज्ञानपीठ असे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार मिळाला हवे होते. अण्णा भाऊ यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांनी पुढे येऊन तशी मागणी करावी असे मत प्रा. डॉ. नंदा पाटील यांनी व्यक्त केले.

पळशी तालुका खानापूर येथे प्रा. डॉ मोहन लोंढे यांच्या “विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ” या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काकासाहेब पाटील होते. 

                लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ आणि ग्रामस्थ पळशी यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात . डॉ मोहन लोंढे यांच्या “विद्यार्थ्यांचे अण्णाभाऊ” या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्यापुढे त्या म्हणाल्या की, अण्णाभाऊ साठे यांनी चित्रीत केलेल्या स्त्रिया या तळागाळातील सर्वहरा अशा वर्गातील आहेत. तरीही त्या कमकुवत किंवा लेच्यापेच्या नाहीत. या सगळ्या स्त्रिया बंडखोर व करारी आहेत. या अर्थाने  अण्णाभाऊ साठे हे स्त्रीवादी लेखक होते. सर्वसामान्य सर्वहारा समाजाचे दुखणं त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं. त्यांच्या साहित्याचे जगभर कौतुक केलं गेलं असलं तरी त्यांना महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या भारतीय सर्वोच्च सन्मान असणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी वर्षानुवर्षांची मागणी प्रलंबित आहे तर साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल त्यांना ज्ञानपीठ मिळाला पाहिजे होते पण ते मिळाले नाही. मराठीतील जगभर पोचलेल्या एकमेव लेखकाला तो पुरस्कार मिळाला नाही याचे दुःख वाटते.

           प्रमुख वक्ते म्हणून बोलताना समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी संत तुकाराम ते तुकाराम साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या पर्यंतचा सांस्कृतिक इतिहासाचा पट उघडून दाखवला. यावेळी बोलताना पुढे बाबर असे म्हणाले की, मराठ्यांना तुकोबा समजू दिले नाहीत. बहुतांश मराठ्यांना सुद्धा तुकोबा मराठ्यांचे असल्याचे माहित नाहीत. म्हणजेच तुकोबांना वाणी ठरवल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. तुकोबांना फक्त देवळात प्रतिष्ठापित केले. त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. आपला मूळपुरुष, मूळ विचारवंत हा तुकोबाचा आहे हे जर मराठ्यांना कळाले असते तर त्यांची संस्कृती वाताहत झाली नसती तसेच कॉ. तुकाराम उर्फ अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा आणि लेखन श्रम लक्षात घेतले असते तर त्यांना आपल्या जातीची अस्मिता म्हणून म्हणून समोर करणाऱ्या समूहाची सुद्धा वाताहत झाली नसती. तर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आमदार सुहास बाबर यांनी कौतुक केले आहे व भविष्यकाळात कोणत्याही सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगितले. रशियात जेव्हा पंतप्रधानांना अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी विचारले असता पंतप्रधान पंडित नेहरू स्वतः त्यांच्या भेटीला मुंबईतील चाळीत आले होते अशी आठवणही आमदारांनी सांगितली.त्याबरोबरच मातंग समाजातील अडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांच्या साहाय्याने त्या कशा सोडवता येतील हे पाहून  योजनांची  माहिती  देण्यासाठी स्वतंत्र शिबिर लावू व समाजाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासनही यावेळी आमदारांनी दिले. स्वागत व प्रास्ताविक प्रसिद्ध लेखक प्रा.डॉ.मोहन लोंढे यांनी केले. यावेळी लोंढे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणेनेच साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी नाममुद्रा उठवू शकलो. असे सांगत आपल्या लेखनामाच्या प्रेरणा स्पष्ट केल्या. आभार ज्ञानू लोंढे यांनी मानले. सूत्रसंचाल संजय जाधव यांनी केले. यावेळी पोलीस पाटील स्मिता पप्पू सुतार माजी उपसरपंच दिनकर जाधव, संभाजी जाधव, काकासो जाधव, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, भरत  जाधव शाळा समितीचे अध्यक्ष, बबन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी भव्य  मिरवणूक काढण्यात आली संयोजन धनाजी लोंढे,  राहुल लोंढे, आबासाहेब लोंढे, अतुल लोंढे, रोहित लोंढे, आकाश लोंढे, संतोष लोंढे, महेश लोंढे, सागर लोंढे, विलास लोंढे, पवन लोंढे, अनिकेत लोंढे, रमेश लोंढे,  प्रशांत लोंढे, लखन लोंढे, सुभाष लोंढे यांनी केले.





चंद्रकांत बाबर यांच्या ॲमेझॉन वरील पुस्तक मागणीसाठी खालील लिंकचा वापर करा 



https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT

https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD

https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY



Post a Comment

0 Comments