परभणी/ प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे नेते मा. प्रविणदादा गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार असलेल्या सर्वच गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा आणि संविधानविरोधी, लोकशाही विरोधी, कडव्या उजव्या जातीवादी ब्राम्हणवादी शक्तींच्या विरोधात व्यक्ती, संघटना बंदीचा कायदा निर्माण करून जनतेला सुरक्षा देण्यात यावी. यांसारख्या विविध मागण्यांसाठी परभणी येथे फुले शाहू आंबेडकरवादी चळवळींच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.
अलीकडील काळात महाराष्ट्रभरात सराईत गुन्हेगार मोकाट सुटलेले असून सर्वसामान्यांपासून बुध्दीजीवी, विद्वान व अनेक सामाजीक चळवळींच्या नेत्यांना त्यांचा त्रास सुरु आहे. चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्ञानेश महाराव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता प्रविनदादा गायकवाड यांच्यावरदेखील प्राणघातक हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये लोकशाही विरोधी, संविधान विरोधी, कडव्या उजव्या जातीवादी ब्राह्मणवादी शक्तींचा हात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शांतता व सुरक्षतेला धोका निर्माण झाला आहे. तरी अनेक जिल्ह्यांवर साखळीने पसरलेल्या या सराईत गुन्हेगारांचा तत्कान बंदोबस्त करण्यात यावा त्यांना अटक करण्यात यावी. प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वच सराईत गुन्हेगारांना मकोका लावण्यात यावा. हे निवेदन देताना खालील मागण्या करण्यात आल्या.
1) संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविनदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वच सराईत आरोपींवर मकोका लावून, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.
2) संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, कडव्या, उजव्या, जातीवादी, ब्राम्हणवादी, व्यक्ती, संघटनांच्या विरोधात जनसुरक्षा विधेयकाच्या धर्तीवर कठोर कायदा करून जनतेला सुरक्षा प्रदान करावी.
3) महाराष्ट्रभरात पसरलेल्या या संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, जातीवादी ब्राह्मणवादी संघटनांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.
हे निवेदन देण्यासाठी निवृत्त तहसीलदार एन.जी खंदारे, ऍड. पवन कुमार शिंदे, प्रज्ञाताई अंभोरे, आशिष भैया वाकोडे, ऍड. माधुरीताई शिरसागर, ऍड. विनोद अंभोरे, नितीन सावंत, धाराजी भुसारे, सुहास पंडित, रामप्रसाद अंभोरे, संतोष धोत्रे, भारत पवार, शिवाजी नेटके,राजकुमार ऐगडे, शाम गवारे,सुशांत भिसे, ज्ञानराज काळे, विष्णू सावंत, भगवान चापके, प्रकाश जाधव, सलीम इनामदार, सोपान मोरे, गजानन देशमुख, सचिन काळे,कॉ. शेख अब्दुल, कॉ. शिवाजी कदम, सतीश भिसे, पप्पू राज शेळके, भाई कीर्तिकुमार बुरांडे, बायजाबाई घोडे, उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments