Type Here to Get Search Results !

असे होते आपले शाहू महाराज या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन २६जून रोजी

 प्रतिनिधी / कोल्हापूर 



राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जन्मवर्षाची आठवण म्हणून शिवाजी विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचे चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हे काम प्रा. डॉ.नंदकुमार मोरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानुसार “असे होते आपले शाहू महाराज” हे चरित्र लिहिले आहे. विद्यापीठाने सोपवलेली जबाबदारी मोरे सर यांनी निष्ठेने पूर्ण केली आहे व  या चरित्र लेखनात त्यांनी काही वेगळे प्रयोग केले आहेत.या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी ११ः०० वा. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

      हे चरित्र आणि या चरित्राची इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती भाषांतरे छत्रपती शाहूंचे जेष्ठ अभ्यासक, इतिहास संशोधक आदरणीय डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आणि सन्माननीय कुलगुरू मा. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेत प्रकाशित होत आहे. या प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हावे, ही विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments