सांगली/ प्रतिनिधी
२१ जून हा दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी योगिनी स्मार्त एकादशी व जागतिक संगीत दिन असलेने या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सांगली, विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी, भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर 'भक्तियोग' म्हणून साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील ५ लाख पेक्षा जास्त नागरिक यात सामील होऊन ३ हजार पेक्षा जास्त केंद्राच्या व छ. शिवाजी स्टेडीअम या मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एकाच वेळी व एकाच तालावर सहभागी होऊन योगासने करणार आहेत. सदरच्या 'भक्तियोग' कार्यक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणेसाठी प्रयत्न होणार आहेत.
यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्या मधील शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, औद्यागिक व व्यापारी केंद्रे इत्यादी ठिकाणी विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शना खाली पारंपारिक पोशाखात एकाच तालावर योगासने केली जाणार आहेत. छ. शिवाजी स्टेडीअम येथे या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचे मुख्य केंद्र असणार आहे. येथून जिल्ह्यातील सर्व केंद्र आभासी पद्धतीने जोडली जाणार असून ५ लाख पेक्षा जास्त नागरिकांचा 'भक्तियोग' चे संचलन व सनियंत्रण केले जाणार आहे.
वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन, गजर यावेळी वाजविले जाणार ताल वाद्याचे ठराविक लयबद्ध चालन हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा वारसा आहे तसेच योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांची एकत्रित साधना होय, योग फक्त व्यायाम नसून हे संपूर्ण जीवनशैलीचे तत्वज्ञान आहे. -." यासाठी शनिवार दि. २१ जून रोजी सकाळी ८.०० ते ८.४५ वा. जागतिक योग दिन, योगिनी स्मार्त एकादशी व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणेसाठी 'भक्तियोग' या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन सांगली जिल्हा परिषद, विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी, भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments