Type Here to Get Search Results !

कोट्यवधी मराठ्यांसह २९ ऑगस्टला मुंबईत जाणार_ जरांगे पाटील

 


आंतरवाली सराटी येथे मुंबई नियोजनासाठी मराठा समाजाची विराट बैठक पार पडली. या बैठकीला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. त्यामुळे हि बैठक ऐतिहासिक ठरली.

बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांचा संदेशः

- इतके दिवस आंदोलन सुरु आहे पण मराठा मागे हटायला तयार नाही; सर्वप्रथम मराठ्यांच्या जिद्दीला सलाम. असेच चिकाटीने लढलो तरच आपल्याला विजय मिळणार आहे.

- आपण घराबाहेर पडल्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही.

- लोकशाहीत संख्येला महत्व असते. व्हाट्सअप फेसबुकवर पाठिंबा नको तर आता प्रत्यक्ष मैदानात उतरा.

कोट्यवधी मराठ्यांसह २९ ऑगस्टला मुंबईत जाणार






- २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता आंतरवाली सोडणार आणि कोट्यवधी मराठ्यांसह २९ ऑगस्टला मुंबईत जाणार

- राजकारणी स्वतः निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात, तुम्ही देखील त्यांच्यासाठी प्रयत्न करता. पण तुमच्यासाठी कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे.

- तुमच्या भागातील राजकीय पुढाऱ्यांना मुंबईला येण्याची विनंती करा. जो येणार नाही तो समाजाचा नाही. मग निवडणुकीत समाजही त्याचा राहणार नाही.

- मराठा मुंबईत शांततेत येणार आहे. पण फडणवीस साहेब, जर मुंबईत एकाही पोराला काठी लागली तर हायवे तर दूरच, महाराष्ट्रातील पाणंद रस्ते सुद्धा सुरु राहणार नाहीत हे ध्यानात ठेवा.

- २ दिवस दोन-एक रात्रीत म्हणजे २८ ऑगस्टला संध्याकाळी मुंबई गाठायची. प्रत्येक गावातील मराठ्यांनी मुंबईला जाण्याच्या तयारीला लागा.

- या वेळी मुंबईत पाऊसही असू शकतो. तयारीनिशी निघा.

- गावकऱ्यांनी वर्गणी करून मराठासेवकांना पेट्रोल, छत्री द्या, तेल, मीठ, मूठभर खायला द्या.

- आण्णासाहेब पाटील, आण्णासाहेब जावळे पाटील, वडजे साहेब, विनायक मेटे आणि पाचशेवर मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. 

सर्व आमदारांना संपर्क केलाः

मी स्वतः २८८ आमदारांपैकी ३ सोडून सर्वांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मागण्या पूर्ण करा असा आग्रह केला. दोन वर्षांत मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदाच फोन करून मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेबद्दल बोललो. २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे. एकदा मी आंतरवाली सोडली तर मागे फिरणार नाही.

प्रमुख मागण्याः

- मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढावा

- न्या. शिंदे समितीला १ वर्षाची मुदतवाढ देणे

- आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना ठरल्याप्रमाणे आर्थिक मदत व नोकरी देणे

- कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडिटी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यात सुलभता आणावी 

- हैद्राबाद, मुंबई, सातारा, औंध गॅझेट लागू करावे

- सगेसोयरे अधिसूचना काढून दीड वर्ष झाले, त्याची अंमलबजावणी करावी

- मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे माघे घ्यावेत

- स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी 

- कोपर्डीच्या ताईला लवकर न्याय मिळावा.


मुंबईला जाण्याचा संभाव्य मार्ग:

अंतरवली सराटी - शहागड, पैठण, अहिल्यानगर, आळेफाटा, शिवनेरी, कल्याण मार्गे मुंबई (मार्गात बदल होऊ शकतो)


सौजन्य; मराठा मार्ग

Post a Comment

0 Comments