सांगली / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या शालेय मुलांच्यासाठी वाहतूक सुविधेअंतर्गत या सांगली जि. प. च्या माध्यमातून PM श्री. जि. प. शाळा नं. १ आरग ता. मिरज या शाळेत शिकणाऱ्या २०७ मुलांना सायकल घेण्यासाठी प्रत्येकी ₹ ६०००/- (रुपये सहा हजार ) प्रमाणे एकूण १२,४२०००/- (बारा लाख बेचाळीस हजार ) इतके अनुदान प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचा विद्यार्थ्यांना लाभ देणारी मिरज तालुक्यातील आपली एकमेव शाळा असून यामुळे वाडी - वस्तीवरून पायपीट करीत येणाऱ्या मुलांची सोय होणार आहे . सदरचे अनुदान विद्यार्थी किंवा पालक यांच्या बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे वर्ग केले जाणार आहे. यामुळे मुले शाळेत नियमित तर येतीलच शिवाय वेळेत पण येतील अशी माहिती शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे यांनी दिली . या योजनेमुळे मुलं आणि पालक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे . जिल्हा परिषदेच्या शाळा आता कात टाकत आहेत. मराठी शाळा आपली गुणवत्ता इतर शाळांच्या स्पर्धेत टिकवून आहेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सुरू असणारे शालेय क्षेत्रातील बदल, आणि बदलती मानसिकता हेही याचे कारण आहे. मराठी शाळांचे रूपडे पालटते आहे. गुणवत्ते बरोबरच भौतिक सेवा सुविधा अधिकाधिक पुरवल्या जात आहेत. संगणककक्षा बरोबरच विज्ञान कक्ष, रोबोटिकलॅब, गणितलॅब, प्रयोगशाळा या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत......... पालकांचा ओढा सुद्धा आता मराठी शाळांकडे वाढताना दिसत आहे. याचे श्रेय अर्थातच शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची बदललेली दृष्टी असेही म्हणावे लागेल. अहोरात्र शिक्षण क्षेत्रासाठी धडपडणाऱ्या शिक्षण सेवकांच्या कार्याची पोच म्हणून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट स्पर्धेच्या काळातही टिकून आहे. याविषयी बोलताना शिक्षक नेते तथा वरिष्ठ मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या पर्यंत कशा पोहोचतील हे आम्ही कटाक्षाने पाहतो. याचे फलित म्हणूनच शाळेत चित्रकला, योगाभ्यास यासारखे विविध विषय शिकवले जात आहेत. आता आमच्या शाळेतील तब्बल २०७ मुलांना सायकल घेण्यासाठी प्रत्येकी ६०००/- (रुपये सहा हजार ) प्रमाणे एकूण १२,४२०००/- (बारा लाख बेचाळीस हजार ) इतके अनुदान प्राप्त झाले आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत बाबर यांच्या ॲमेझॉनवर उपलब्ध असणारी पुस्तके मागवण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा...
https://www.amazon.in/dp/B0FCM5XRKT
https://www.amazon.in/dp/B0FCM72XPD
https://www.amazon.in/dp/B0FCM6BWHY




Post a Comment
0 Comments