Type Here to Get Search Results !

चांदोली धरण क्षेत्रात संततधार...

 



शिराळा/ प्रतिनिधी 


चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. सलग चार दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली आहे. गेल्या 21 दिवसात धरणात 5.68 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 8.73 टीएमसी अधिक पाणीसाठा यंदा आहे. सध्या धरणात 19.36 टीएमसी पाणीसाठा असून धरण 56.29 टक्के भरले आहे. चांदोलीधरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चार ते पाच हजार मिलिमीटर इतके आहे. यंदा पावसाने मे महिन्यातच सुरुवात केली आहे. मे महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात अर्धा ते पाऊण टीएमसी पाण्याची वाढ झाली. एक जूनपासून 22 जूनअखेर 22 दिवसात 602 मिलिमीटर पाऊस पडला. गतवर्षी याच 22 दिवसात 329 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत 273 मिलिमीटर पाऊस यंदा अधिक बरसला आहे.



गेल्या 24 तासात 33 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात जवळपास 7951 क्युसेक पाण्याची आवक होत आहे, तर 1720 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.दरम्यान, आज धरणाची पाणी पातळी 609.50 मीटर इतकी आहे. धरणात 19.36 टीएमसी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 56.29 आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा 13.68 टीएमसी असून त्याची टक्केवारी 39.77 आहे.

चांदोलीतील आजची स्थिती...

पाणी पातळी (मीटर) : 609.50

24 तासातील पाऊस (मि.मी.) : 33

एकूण पाऊस : 602

आवक : 7951 क्युसेक, विसर्ग : 1729 क्युसेक, टीएमसी : 19.36, टक्केवारी : 56.28




Post a Comment

0 Comments