Type Here to Get Search Results !

बसचा अपघात, बस विहिरीत जाता जाता वाचली

 



प्रतिनिधी : तासगाव


तासगाव तालुक्यातील येळावी येथे एसटी बसला अपघात झाला आहे. अगदी विहिरीच्या काठावर येऊन बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात १७प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्याच्या वल्लभनगरहून ३१ प्रवाशांना घेऊन चिंचवड-तासगावसाठी ही एसटी बस निघाली होती. तासगावच्या जवळच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटीच्या समोर आला. ज्यामुळे एसटी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीच्या दिशेने गेली. सुदैवाने विहिरीच्या अलीकडेच कठड्यावर जाऊन एसटी बस थांबल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मागील चाक रस्त्याच्याकडेल असणाऱ्या चरीत (पाट) अडकल्याने समोर पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन एसटी बस थांबली. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. झालेल्या अपघातात चालकासह १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे. एसटी बसमधील १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

***********

नेमकी घटना कशी घडली?


समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता सोडून शेतातील विहिरीकडे गेली. सुदैवाने बसचे चाक तिथे असलेल्या चारीत फसले. अन्यथा बस थेट विहिरीत कोसळली असती.

***

*********

Post a Comment

0 Comments