साहित्य अकादमीचा यंदाचा “बाल वाङ्मय पुरस्कार” डॉ. सुरेश सावंत यांना तर युवा पुरस्काराचे मानकरी कादंबरीकार प्रदीप कोकरे.
….. विश्वास पाटील
प्रतिनिधी/ मुंबई
काही वेळापूर्वी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या कार्यालयातून भारताच्या २३ भारतीय भाषेतील यंदाचे युवा आणि बालवाङ्मय पुरस्कार जाहीर झाले. ज्यामध्ये मराठीतील ज्येष्ठ बालवांग्मय लेखक नांदेडचे डॉ. सुरेश सावंत यांच्या “आभाळमाया”या ग्रंथाचा समावेश आहे. तसेच मराठीतील तरुण लेखक श्री प्रदीप कोकरे यांच्या “खोल खोल दुष्काळ डोळे” ह्या कादंबरीला यंदाचा युवावांग्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारांमध्ये वरील दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा व मराठी लेखकांचा समावेश आहे. डॉक्टर सावंत यांनी आजवर बालवाङ्मयात ४० पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती करून मोठे योगदान दिलेले आहे. प्रदीप कोकरे यांनी मुंबईच्या गिरणी कामगार संपाच्या नंतरचे जीवन, वाढती बेकारी आणि ग्रामीण भागातून नागर जीवनात येऊन स्थिर होऊ पाहणाऱ्या युवकांचे जग आपल्या कादंबरीमध्ये टिपलेले आहे. अशी माहिती साहित्य अकादमीच्यावतीने विश्वास पाटील यांनी दिली.





Post a Comment
0 Comments